Global Warming : वातावरणातील बदलामुळे (Global Warming) तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. दरम्यान, यूएस नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंटल प्रिडिक्शनने उष्णतेबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. 3 जुलै हा जागतिक पातळीवरील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस (World Hottest Day) असल्याचे नमूद केले आहे.
सात वर्षांचे रेकॉर्ड मोडीत
जगभरातील उष्णतेच्या लाटेमुळे सोमवारी सरासरी जागतिक तापमान 17.01 अंश सेल्सिअसवर पोहोचले. या तापमानाने 2016 मध्ये केलेल्या 16.92 अंश सेल्सिअसच्या मागील विक्रमाला मागे टाकले आहे. त्याच वेळी, दक्षिण अमेरिका अलिकडच्या आठवड्यात तीव्र उष्णतेशी झुंज देत आहे. याशिवाय चीनमधील लोकांनाही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. येथील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर कायम आहे. त्याच वेळी, उत्तर आफ्रिकेत तापमान 50 अंश सेल्सिअसच्या जवळपास नोंदवले गेले आहे. त्रासदायक बाब म्हणजे जिथे हिवाळा असला तरी तिथे उष्मा जाणवत आहे.
हिवाळ्यातही उन्हाळा
अहवालात म्हटले आहे की, अंटार्क्टिकामध्ये सध्या हिवाळा आहे. परंतु, येथे असामान्यपणे उच्च तापमान नोंदवले गेले आहे. अर्जेंटिनो बेटांमधील युक्रेनच्या वर्नाडस्की रिसर्च बेसने अलीकडेच जुलै तापमानाचा विक्रम 8.7 °C ने मोडला.
शास्त्रज्ञ म्हणतात…
ब्रिटनचे हवामान शास्त्रज्ञ फ्रेडरिक ओटो यांनी वाढत्या तापमानाविषयी सांगितले की, लोकांसाठी ही मोठी शिक्षाच आहे. त्याचवेळी, इतर शास्त्रज्ञांनी याला हवामान बदल जबाबदार असल्याचे सांगितले. संशोधकांचा असा विश्वास आहे की एल निनो नावाची नैसर्गिक हवामानातील घटना आणि मानवाकडून होणारे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन हे तापमानवाढीस कारणीभूत आहे. प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होण्याच्या घटनेला ‘एल निनो’ म्हणतात.