World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) विजयी सुरुवात केली आहे. रविवारी ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सामन्यात भारताने शानदार विजयाची नोंद केली. पण टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या निराशाजनक कामगिरीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर असे तीन मोठे खेळाडू खाते न उघडता शून्यावर बाद झाले. आता माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी हिटमॅनच्या फलंदाजीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकात रोहितचे (Rohit Sharma) फूटवर्क अजिबात चांगले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
रोहित शर्माच्या फलंदाजीवर गावस्कर काय म्हणाले?
ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्माने 6 चेंडू खेळले होते, मात्र त्याला एकही रन करता आला नाही आणि तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या फलंदाजीबद्दल गावसकर यांनी लिहिले की, “रोहित शर्माबद्दल बोलायचे झाल्यास, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही. रोहित हा टीम इंडियाचा कर्णधार आहे, ज्याने विश्वचषकाची सुरुवात शून्याने केली. 2019 च्या विश्वचषकात रोहितने 5 शतके झळकावली होती आणि अर्धशतक देखील केले होते. हा त्याचा शेवटचा विश्वचषक देखील असू शकतो, परंतु यातील त्याचे फूटवर्क खरोखरच खराब होते. जर तो 2019 चा फॉर्म साध्य करू शकला तर हे भारतीय संघासाठी चांगलेच ठरेल.
वर्ल्ड कपमध्ये यशस्वी सुरुवात केल्यानंतर टीम इंडिया आता आपला दुसरा सामना अफगाणिस्तान (Afghanistan) क्रिकेट संघासोबत खेळणार आहे. हा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. भारतीय चाहत्यांना 2019 च्या विश्वचषकातील रुपात रोहितला पहायला आवडेल, जेव्हा त्याने 5 शतके झळकावली होती. असे झाल्यास 2023 मध्ये भारताला विश्वचषक जिंकणे सोपे होईल.