World Cup 2023 : पुढील महिन्यापासून भारत आयसीसी एकदिवसीय विश्वचषकचे (World Cup 2023) यजमानपद भूषवणार आहे. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महाकुंभ सुरू होणार आहे. पहिला सामना इंग्लँड आणि न्यूझीलँड (ENG vs NZ) यांच्यात होईल, ज्या संघांनी 2019 च्या विश्वचषकात शेवटचा सामना खेळला होता.
पहिला सामना अहमदाबाद येथे होणार
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमपासून क्रिकेटच्या या महोत्सवाला सुरुवात होणार असून अंतिम सामनाही याच स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत भारत 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. 10 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया (Team India) विश्वचषक स्पर्धेत उतरणार आहे.
धोनीच्या नेतृत्वात भारताला विजेतेपद
2013 मध्ये कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारताने शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. अशा परिस्थितीत मायदेशात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि द्रविड यांच्यावर खूप दडपण असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना खूप रोमांचक असेल.
स्मिथचे मोठे विधान
आता ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) विश्वचषकाबाबत एक मोठं विधान केलं आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मिथ म्हणाला की, मला वाटतं 2023 च्या विश्वचषकाची फायनल ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होईल. अशा परिस्थितीत आता चाहत्यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. मात्र, चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील अंतिम सामना पाहायला आवडेल.