World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी सामन्यात (World Cup 2023) शादाब खानला संघातून वगळले पाहिजे असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने (Shoaib Malik) व्यक्त केले. शादाब खान (Shadab Khan) गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. गेल्या 10 सामन्यांची आकडेवारी पाहिली तर शादाब खानने केवळ 121 धावा केल्या आणि 11 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यातील विश्वचषक सामना शुक्रवारी बंगळुरू येथे होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी सामन्यात शादाब खानला संघातून वगळले पाहिजे असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने व्यक्त केले. शादाब खान सध्या फॉर्ममध्ये नाही. मैदानावर त्याची कामगिरी चांगली राहिलेली नाही. विश्वचषकामध्ये शादाब खानने मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स घेणे आणि धावा थांबवणे अपेक्षित आहे. मात्र तसे करण्यात त्याला यश येत नाही. श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या या लेगस्पिनरने 8 ओव्हरमध्ये 55 धावा दिल्या.
शादाब खानचा खराब फॉर्म हा पाकिस्तानसाठी काळजीचा ठरत आहे. गेल्या 10 सामन्यांमध्ये शादाब खानने 121 धावा केल्या आणि 11 विकेट्स घेतल्या. तो पाच वेळा एकाच अंकात बाद झाला. शोएब मलिकने सांगितले की शादाब खान या क्षणी संघर्ष करत आहे तर संघाला त्याच्याकडून 10 ओव्हर्सचा कोटा पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. शादाब खान नक्कीच खूप चांगला गोलंदाज आहे, पण सध्या तो संघर्ष करत आहे. जर तुम्ही अॅडम झाम्पाकडे (Adam Zampa) बघितले तर तुम्हाला दिसेल की त्याचा लेग स्पिन योग्य ठिकाणी पडत नाही, पण तरीही त्याने लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध चार विकेट घेतल्या. त्याने त्याचे स्लाइडर आणि गुगली चांगल्या प्रकारे वापरले.
जोपर्यंत शादाबचा संबंध आहे पाकिस्तान क्रिकेट संघाची अपेक्षा आहे की त्याने चार किंवा सहा ओव्हर्स नाही तर त्याच्या कोट्यातील पूर्ण 10 ओव्हर्स टाकाव्यात. त्यामुळे शादाब खानला संघातून वगळावे असे मला वाटते. त्याच्या जागी अन्य खेळाडूला संधी दिली पाहिजे, असे मलिक म्हणाला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकातील 18 वा सामना शुक्रवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. कोणता संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.