अहमदनगर : तुम्ही घर किंवा ऑफिसमधून काम करत असलात तरी अनेकदा तुमचे लक्ष कामावरून विचलित होते. अशा परिस्थितीत एका दिवसात होणारे कामासाठी बराच वेळ लागतो. तथापि, जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक कठीण असते कारण घरातील वातावरण वेगळे असते. सध्याच्या काळात तर लाखो कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. घरी बसून ऑफिसचे काम करणे म्हणजे वेगळेच आहे. कारण, आपण घरी ऑफिसचे वातावरण तयार करू शकत नाही.
त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या कामकाजात फरक आहे. पण, सध्या कोरोनाचे संकट असल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. त्यामुळे लाखो कर्मचारी घरुन काम करत आहेत. अशा परिस्थितीत कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. चला तर मग, याबाबत आधिक माहिती घेऊ या..
सर्वात आधी एक यादी बनवा आणि त्यात तुमच्या दिवसातील सर्व घडामोडींची माहिती नोंद करा. यामुळे तुम्हाला दिवसभरात काय करायचे आहे हे कळेल. हे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे पूर्ण करण्यात मदत करेल. काम सुरू करण्याआधी तुम्ही ही यादी तयार करू शकता. यानंतर, काम संपल्यावर, आज तुम्ही काय केले ते पहा. यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. याशिवाय, हे रोजचे रिमाइंडर म्हणून काम करेल जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार नाहीत.
घरून काम करण्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणाहून काम करू शकता. आपण घरी कामासाठी एक कामाची जागा तयार करू शकता. यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी वातावरण मिळेल. यामुळे तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होईल. कामाशी संबंधित गोष्टी कामाच्या ठिकाणी ठेवू शकता. यामुळे तुम्हाला काम केल्यासारखे वाटेल. तुमचे काम आधिक चांगल्या पद्धतीने होईल.
वर्क फ्रॉम होम वेळी वारंवार स्मार्टफोन हाताळत असताल तर तुमचे कामावर लक्ष केंद्रीत होणार नाही. या सवयीमुळे कामाचा महत्वाचा बराच वेळ वाया जातो. त्यामुळे लक्षही विचलित होते. दर काही मिनिटांनी तुम्ही फोन हाताळत असाल तर त्याचा असा परिणाम होऊ शकतो.
वर्क फ्रॉम होम दरम्यान तासनतास एकाच जागी बसून काम करावे लागते. त्यामुळे मानदुखी, पाठदुखी अन्य शारीरीक समस्या उद्भवतात. त्यामुळे या समस्या कमी करण्यासाठी मध्ये थोडा ब्रेक घ्या, त्यामुळे शरीराची हालचाल होईल आणि पाठदुखीसारख्या समस्या कमी होतील.