Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गैरसमज सोडा.. तरुणींनो, तसले प्रकार अजिबात आवडत नाहीत पुरुषांना; वाचा महत्वाची माहिती

जेव्हा गोष्ट रिलेशनशिपबाबत असते. त्यावेळी तरुण-तरुणीच नाही, तर वय झालेली मंडळीही पझेसिव्ह असतात. लोकांच्या मनात नेहमीच एक प्रतिमा असते, त्यानुसारच त्यांना त्यांचा जोडीदार आवडतो. जोडीदार कसा असावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आवडीचा विषय आहे. काही लोक याबाबतही त्यांच्या अनुभवाचे धडे घेतात. तर काही लोक इतरांच्या बोलण्यावर आधारित आपले आडाखे बनवत असतात. त्यांचे अनुभव हे इंटरनेटवरील कथा किंवा चित्रपटांवर आधारित असूही शकतात. त्यामुळे या भुलभुलैय्यामध्ये आपण आणखी फसण्याची शक्यता असते. त्यातही तरुणी किंवा महिलांना आपले जोडीदार आकर्षित करून घेण्याच्या वेगळ्या ट्रिक्स हव्या असतात.

Advertisement

आपण पाहतो आणि ऐकतो यापेक्षाही वास्तव खूपच वेगळे आहे. मुलींनी असे केले किंवा त्या क्रियाकलापांद्वारे पुरुषांना आकर्षित केले जाईल, याबाबतच्या घोळात अजिबात अडकत बसू नका. त्याबाबतची माहिती देणारा हा लेख आहे. बर्‍याच सिनेमांपासून ते सिरीयलपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल की, ज्यात एक पात्र भारतीय वेषभूषा सोडून पाश्चात्य कपड्यांकडे वळले की तिच्याकडे जोडीदार आकर्षित होतात. हे बदलताना दाखवले जाते आणि नंतर मुलीही त्याच्याकडे आकर्षित होतात. तथापि, पाश्चात्य परिधान आकर्षण वाढवते ही कल्पना पूर्णपणे चांगली कल्पना आहे असे नाही. आपण काय परिधान केले आहे त्यापेक्षा आपण स्वतःला कसे प्रेझेंट करतात याकडे मुलांचे लक्ष असते. आपला आत्मविश्वास आणि कपड्यांमधील साधेपणा याही गोष्टी अटेन्शनची पातळी वाढवतात. याबाबतचे इतर मुद्दे असे :

Loading...
Advertisement
  • मुली आपल्या भावना दाखवत नाहीत. अनेकदा मग मुलांना त्यांच्या मनात काय आहे हेच समजत नसल्याने ते इतरत्र ट्राय करू शकतात. मुलींनी भावना दाबल्या पाहिजेत असेच शिकवले जात असल्याने असे भारतात जास्त होते. त्यामुळे आपण खूप बिझी आहोत आणि आपल्याला त्या मुलाची किंवा जोडीदाराची अजिबात गरज नाही, असले प्रकार टाळा.
  • नात्याच्या सुरूवातीस जोडप्याला एकमेकांची अधिक काळजी घेणे आवडते यात काही शंका नाही. जेव्हा जोडीदार मदतीसाठी विचारतो, तेव्हा ते रात्रीचे 1 वाजले असले तरीही पुढे जाऊन त्याला मदत करतात. तथापि, नाती जसजशी पुढे जातात तशी हीच गोष्ट मुलांमध्ये चिडचिडेपणा आणू लागते. अत्यधिक अवलंबित्व हे संबंधाला ओझे बनवते आणि मग वितुष्ट येऊ शकते. चित्रपटापेक्षा वास्तव वेगळे असते याचे भान ठेवा.
  • एकमेकांची अतिशय जास्त काळजी जशी घेऊन नये. तसेच एकमेकांना जळवत असलेल्या गोष्टी करणेही टाळा. एकमेकांची गरज आणि भावना समजून घेऊन जागा. मुलींना जास्त पैसे खर्च करणारा जोडीदार हवा असेही वाटते. मात्र, चित्रपटात दाखवतात तशी उधळपट्टी करण्याची क्षमता प्रत्येकाची असू शकत नाही. त्यामुळे ऐपतीप्रमाणे खर्च करावा.

अशा पद्धतीने आपले नाते हे निरोगी आणि निकोप कसे राहील याकडे लक्ष द्यावे. दुसऱ्याचा जोडीदार किंवा पती काय करतो यापेक्षाही महत्वाचे आहे की तुमच्या दोघांची भानाविक नाळ कशी आहे. प्रणय ही एक छोटी गोष्ट आहे. एकमेकांना समजून घेण्याचा मुद्दा हा नात्यातील वीण आणखी घट्ट करतो. त्यासाठी सिनेमा सोडून वास्तव स्वीकारा. इतकेच..

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply