दिल्ली –   रशिया आणि युक्रेनमधील (Russia And Ukraine) युद्धादरम्यान आणखी एक लढाई सुरू होणार आहे का? चीनच्या (China) लष्करी अधिकाऱ्यांची एक ऑडिओ क्लिप लीक (Audio clip leaked) झाली असून, त्यानुसार चीन रशियाप्रमाणे तैवानवर (Taiwan) हल्ला करण्याच्या तयारीत आहे. ही ऑडिओ क्लिप चिनी मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर हेंग यांनी ट्विट केली आहे. 57 मिनिटांची ही ऑडिओ क्लिप LUDE MEDIA नावाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आली आहे.

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

क्वाड समिटपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या प्रकरणी चीनला कडक संदेश दिला आहे. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका प्रत्युत्तर देईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, तैवानवर हल्ला करण्याचा विचार करूनही चीन धोक्याशी खेळत आहे. याचा फटका त्याला सहन करावा लागणार आहे. ते म्हणाले, आम्ही वन चायना धोरणावर सहमती दर्शवली होती. मात्र कुठेही जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न झाला, तर त्यालाही चोख उत्तर दिले जाईल.

यूट्यूब चॅनलचा दावा आहे की ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही ऑडिओ क्लिप लीक केली आहे तो शी जिनपिंग यांची तैवानवरील योजना जगासमोर उघड करू इच्छित आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, तैवानमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण करण्यासाठी CPC आणि PLK यांच्यात चर्चा करण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपची अद्याप पूर्ण पुष्टी झालेली नाही. हे संभाषण चीनमध्येच रेकॉर्ड झाल्याचे दिसत असले तरी.

चीनच्या इतिहासात एवढ्या महत्त्वाच्या बैठकीची ऑडिओ क्लिप लीक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी एक लेफ्टनंट जनरल आणि तीन मेजर जनरलना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. या क्लिपनुसार या बैठकीत चिनी लष्कराचे उच्च अधिकारी उपस्थित होते.

या ऑडिओनुसार, पूर्व आणि दक्षिणी वॉरझोन्सने ग्वांगडोंग प्रांताला दिलेल्या टास्कमध्ये 20 श्रेणींचा समावेश आहे. त्यानुसार 1.40 लाख सैनिक, 953 जहाजे, 1653 तुकड्या, 20 विमानतळ आणि गोदी, 6 दुरुस्ती आणि जहाज बांधणी यार्ड, 14 आपत्कालीन हस्तांतरण केंद्र, रुग्णालये, रक्त केंद्रे, तेल डेपो, गॅस स्टेशन इत्यादींचा उल्लेख करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप बरोबर असेल, तर चीन तैवानवर हल्ला करण्याच्या किती मोठ्या तयारीत आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

चीन तैवानवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत? लीक झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये 953 जहाजे, 1.40 लाख सैनिक असल्याची चर्चा आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version