Wholesale Inflation Report | घाऊक महागाईचा अहवाल मिळाला; पहा, कडाक्याच्या उन्हाळ्यात महागाई वाढली की घटली?

Wholesale Inflation Report : केंद्र सरकारने आज देशातील घाऊक महागाईचा (Wholesale Inflation Report) अहवाल जारी केला. देशातील ठोक महागाईच्या दरात थोडी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जानेवारी फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात या महागाईत वाढ नोंदवली गेली आहे. केंद्र सरकारने आज ही महागाई दराची आकडेवारी जाहीर केली आहे. मार्च महिन्यात घाऊक महागाई दर 0.53 टक्क्यांवर आला आहे. महागाई दर सध्या वाढताना दिसत आहे. मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये हा दर 0.27% इतका होता तर जानेवारीमध्ये देखील हा आकडा 0.27% असा राहिला होता.

केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये अन्नधान्य महागाई, वीज, कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायू यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या किमतीत वाढ तसेच उत्पादन क्षेत्रातील महागाई यामुळे घाऊक महागाईत वाढ झाल्याचे म्हटले आहे. घाऊक महागाई दरामध्ये वस्तूंचा घाऊक व्यापार आणि त्यांच्या घाऊक किमतीत झालेली वाढ यांची मोजणी करून डेटा प्रसिद्ध केला जातो.

Pakistan Inflation | महागाईत कोणता देश नंबर वन? आशियाई बँकेच्या अहवालानेच दिलं उत्तर

Wholesale Inflation Report

कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या घाऊक महागाईचा दर 1.35% राहिला तर खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 1 टक्के राहिला. खनिजांच्या घाऊक महागाईचा दर 0.58% तर अखाद्य वस्तूंच्या महागाईचा दर 0.44% नोंदवला गेला आहे. विजेचा घाऊक महागाई दर 0.13% आणि खनिजांच्या घाऊक महागाईचा दर 0.13% इतका राहिला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये कोळशाच्या महागाई दरात घट झाली असून ती -0.15 टक्क्यांवर आली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोळशाच्या महागाई दारात घट झाली आहे. खाद्यपदार्थ, मोटार वाहने, ट्रेलर, सेमी ट्रेलर, रबर, प्लास्टिक उत्पादने, रसायने, रासायनिक उत्पादने इत्यादींच्या किमतीमध्ये महिना दर महिना वाढ झाली आहे. यावेळी यंत्रसामग्री आणि उपकरणे, बेस मेटल, फार्मास्युटिकल, औषधी रसायने, वनस्पतीजन्य उत्पादने, कापड, फॅब्रिकेटेड धातू या उत्पादनांच्या किमतीत मात्र घट झाली आहे.

Retail Inflation : किरकोळ महागाईचा अहवाल मिळाला; पहा, फेब्रुवारीत महागाई घटली की वाढली?

Leave a Comment