Congress President Election : नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Election) मतमोजणी बुधवारी होणार आहे. मतमोजणीनंतर नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. नवीन अध्यक्षांच्या घोषणेमुळे पक्षाला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा वरचष्मा आहे. खरगे यांना गांधी घराण्याचा पाठिंबा आहे. यासह त्यांच्या नामांकनावेळी पक्षातील सर्व बडे नेते उपस्थित होते. अशा स्थितीत निवडणुकीत खर्गे यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. बुधवारी झालेल्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणार आहे.
खरगे हे गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जातात. ते अध्यक्ष झाले तर त्यांच्या निर्णयांवर गांधी घराण्याचा ठसा राहणार आहे. आपण अध्यक्ष झालो तर पक्षाच्या कारभारात गांधी घराण्याचे मार्गदशर्न आणि सहकार्य घेण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनीच रविवारी स्पष्ट केले. कारण, गांधी घराण्याने पक्षाला मोठे योगदान दिले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
पक्षाध्यक्षपदासाठी 9915 प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार होता. निवडणूक हाताळणाऱ्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 9457 प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. अशा प्रकारे 67 मतदान केंद्रांवर सुमारे 96 टक्के मतदान शांततेत पार पडले.
मिस्त्री म्हणाले की, सर्व मतपेट्या रिकाम्या करून एकाच ठिकाणी जमा केल्या जातील. त्यामुळे कोणत्या राज्यात कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली हे उमेदवारांना कळू शकत नाही. मतमोजणी संपल्यानंतर नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. पक्षाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारपर्यंत निकाल जाहीर होईल.
- हे सुद्धा वाचा : Congress President Election : काँग्रेससाठी आज महत्वाचा दिवस; ‘या’ उमेदवारांचे भवितव्य ठरणार..
- BJP : ‘या’ भाजप नेत्याने केला मोठा दावा.. नितीश कुमार सरकारला दिले ‘हे’ मोठे आव्हान..
- Himachal Elections : काँग्रेसची ‘ती’ जुनी सवय अजूनही कायम; पहा, तिकीट वाटपात काय केले काम..
- Rajasthan Congress Crisis : काँग्रेसचा आणखी एक प्लान; पहा, ‘कसे’ टळणार राजकीय संकट ?