Lok Sabha Speaker : कोण होणार लोकसभा अध्यक्ष? भाजप घेणार मोठा निर्णय, ‘या’ नेत्याला पुन्हा मिळणार संधी

Lok Sabha Speaker : लोकसभा निवडणुकीत एनडीएला तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने देशात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे.

तर दुसरीकडे काल (25 जून) पासून संसदेचा पहिला अधिवेशन सुरू झाला असून उद्या 26 जून रोजी लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडून सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यामुळे एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा गेल्या लोकसभेचे अध्यक्ष असलेले ओम बिर्ला एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार केले जाऊ शकते.

मात्र, बिर्ला अधिकृत उमेदवार असतील की नाही याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागांवर विजय मिळाला आहे तर इंडिया आघाडीला 240 जागांवर विजय मिळाला आहे. एनडीएमध्ये भाजपला 240, जेडीयूला 12, टीडीपीला 16 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 07 जागांवर विजय मिळाला होता. 

निकालानंतर काही अपक्ष खासदारांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.

बुधवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. बिर्ला सध्या कोटा, राजस्थानमधून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत.

तर दुसरीकडे इंडिया आघाडी देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा ओम बिर्ला यांना लोकसभेचे अध्यक्ष पदासाठी संधी देऊ शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. मात्र इंडिया आघाडी देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही याबाबत देखील अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही.

Leave a Comment