मुंबई – विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताचा पुढचा कर्णधार कोण असावा याबाबत वेगवेगळ्या दिग्गजांची प्रतिक्रीया समोर येत आहे. सुनील गावसकर यांना रिषभ पंतला कर्णधार बनवायचे आहे, तर माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसाकर अश्विनकडे पुढील कर्णधार म्हणून पाहत आहेत. याच दरम्यान आता केविन पीटरसनचे (Kevin Pietersen) मतही समोर आले आहे. हा माजी दिग्गज खेळाडू देखील ओमानमध्ये सूरु असलेल्या लेजंड क्रिकेट लीगचा भाग आहे.
पीटरसनने म्हटले आहे की रोहित शर्मा कसोटीत भारताचे कर्णधार म्हणून सर्वोत्तम आहे. विराट हा चांगला कर्णधार होता, पण आता त्याने स्वतःला दूर केले असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, असे तो म्हणाला. यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.
माजी इंग्लिश दिग्गज पुढे म्हणाला की आता कोहलीनंतर, रोहित शर्मा हा कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा सर्वोत्तम व्यक्ती आहे कारण त्याच्याकडे उत्कृष्ट नेतृत्व गुण आहेत. त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी पाच विजेतेपदे जिंकली आहेत. अशा स्थितीत कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत त्याला कोणीही हरवू शकत नाही.
लीजेंड क्रिकेट लीगबद्दल बोलताना केविन म्हणाला की, मी पुन्हा मैदानावर येण्यासाठी खूप उत्साहित आणि रोमांचित आहे. तो म्हणाला की अशा प्रकारची लीग जुन्या काळातील क्रिकेटपटूंना खरोखर प्रेरणा देत आहे. आमच्या खेळाडूंमध्ये अजूनही खेळण्याची क्षमता आहे आणि आम्ही पुन्हा मैदानावर आल्याचा आनंद वाटतो.(Who is best suited to be India’s Test captain? Kevin Peterson says …)