Sheikh Hasina : बांगलादेशात सुरू असणाऱ्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 300 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. तर काल 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देश देखील सोडला आहे.
देश सोडून ते भारतात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या देखरेखीखाली त्यांचे विमान भारतीय सीमेत दाखल झाले.
शेख हसीना भारतात कुठे आहेत
शेख हसीना यांचे विमान दिल्लीला पोहोचले पण IGI ऐवजी ते गाझियाबाद, दिल्ली NCR येथील हिंडन एअरबेसवर उतरले. सोमवारी संध्याकाळी हसीनाचे विमान उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर उतरले.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हिंडन विमानतळावर शेख हसीना यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना हिंडन एअरबेसच्या सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत.
शेख हसीना लंडनला कधी जाणार?
वृत्तानुसार, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात काही काळ घालवल्यानंतर लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. शेख हसीनानेही इंग्लंडकडे आश्रय मागितला आहे.
शेख हसीना आपल्या मुलीला भेटू शकतात
हसीना दिल्लीत राहणारी तिची मुलगी सायमा वाजिदला भेटण्याची शक्यता आहे. सायमा वाजिद या दक्षिण-पूर्व आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालक आहेत. हसिना यांचे दिल्लीत आगमन आणि NSA सोबत झालेल्या त्यांच्या भेटीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
बांगलादेशात संसद बरखास्त
शेख हसीना देशातून बाहेर पडल्यानंतर बांगलादेश लष्कराच्या हाती सत्ता गेली आहे. बांगलादेशची संसद बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी बांगलादेशची संसद बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.