WhatsApp Update: व्हॉट्सॲप आज जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप पैकी एक आहे. कंपनी नेहमीच त्याच्या युजरसाठी वेगवेगळ्या फीचर्स सादर करत असते तसेच कंपनीने युजरच्या सेफ्टीकडे देखील मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आहे.
मात्र आता व्हॉट्सॲपने एक मोठा निर्णय घेतल्याने त्याचा फटका हजारो युजर्सला बसणार आहे. होय, समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी आता तब्बल 35 स्मार्टफोनवर आपली सर्विस पूर्णपणे बंद करणार आहे.
व्हॉट्सॲपने घेतलेला या निर्णयामुळे आता या 35 स्मार्टफोनवर व्हाट्सअप काम करणं बंद करणार आहे. मग जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती.
35 स्मार्टफोनला सपोर्ट मिळणार नाही
CanalTech च्या अहवालानुसार व्हॉट्सॲप 35 स्मार्टफोनचा सपोर्ट बंद करत आहे. या लिस्टमध्ये Android आणि iPhone दोन्हींचा समावेश आहे.
यात सॅमसंग, ऍपल, सोनी, एलजी आणि इतर ब्रँडचे काही हँडसेट आहेत, ज्यावर व्हॉट्सॲप सपोर्ट आता बंद होणार आहे.
या मोबाईलवर परिणाम होईल
Samsung: Galaxy Ace Plus, Galaxy Core, Galaxy Express 2, Galaxy Grand, Galaxy Note 3, Galaxy S3 Mini, Galaxy S4 Active, Galaxy S4 Mini, Galaxy S4 Zoom
Motorola: Moto G, Moto
Apple: iPhone 5, iPhone 6, iPhone 6s, iPhone 6s Plus, iPhone SE
Huawei: Ascend P6 S, Ascend G525, Huawei C199, Huawei GX1s, Huawei Y625
Lenovo: Lenovo 46600, Lenovo A858T, Lenovo P70, Lenovo S890, Lenovo A820
Sony: Sony Xperia Z1, Sony Xperia E3, Sony Xperia M
LG: Optimus 4X HD, Optimus G, Optimus G Pro, Optimus L7
व्हॉट्सॲप युजरच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आहे. त्यामुळे, या जुन्या डिवाइसमध्ये व्हॉट्सॲपच्या नवीनतम अपडेटला आवश्यक असलेली प्रक्रिया मिळणार नाही.