Whatsapp Server Down: पुणे (pune): इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची सेवा मंगळवारी (services of instant messaging app WhatsApp) दुपारी भारतात ठप्प झाली आहे. हा डाऊन मेसेज व्हॉट्सअॅप चॅट्स आणि ग्रुप चॅटमध्ये दिसत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात आणि पाहण्यातही यूजर्सना अडचणी (down is being seen in WhatsApp chats and group chats) येत आहेत. आज दुपारी 12.30 वाजल्यापासून व्हॉट्सअॅपची सेवा बंद झाली आहे. सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटमध्ये मेसेजिंगमध्ये अडचण आली आणि आता वापरकर्ते सामान्य चॅटमधूनही संदेश पाठवू शकत नाहीत.
Whatsapp Down झाल्यामुळे वैतागले युजर; पहा नेमके काय झालेय यामागे कारण https://t.co/HMtZGFWlAO
— Krushirang (@krushirang) October 25, 2022
याबाबत आतापर्यंत 11 हजारांहून अधिक युजर्सनी सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप सेवा बंद झाल्याबाबत तक्रार केल्या आहेत. तसेच स्वतंत्र ट्रॅकिंग पोर्टल ‘डाउनडिटेक्टर’नेही व्हॉट्सअॅप सेवा निलंबित केल्याची पुष्टी केली आहे. सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याने भारतातील युजर्सना व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नुकतीच व्हॉट्सअॅपने अधिकृतपणे घोषणा केली होती की 25 ऑक्टोबरपासून व्हॉट्सअॅप अनेक स्मार्टफोनमध्ये आपला सपोर्ट बंद करेल. अॅपलसारख्या मोठ्या कंपन्यांचाही या फोनमध्ये समावेश आहे. यानंतर हा डाऊन व्हॉट्सअॅपवर दिसत आहे. तसेच अनेकांना हा ग्रहण झटका वाटत असून त्यावर मीम येण्यास सुरुवात झाली आहे. व्हॉट्सअॅपला ग्रहण लागल्याचे मेसेज ट्विटर आणि फेसबुक यावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
WhatsApp ला ग्रहणाचा फटका? 😜
— Dinesh Gune (@gunedr) October 25, 2022