Whatsapp Server Down: मुंबई (Mumbai): आज दुपारी अचानक फेसबुकतर्फे चालवले जाणारे व्हॉट्सअॅप डाउन झाले. 10-15 मिनिटे लाखो लोकांना समजले नाही की, व्हॉट्सअॅपवर काहीही का शेअर केले जात नाही. तसेच नवीन मेसेज येत नाहीत. थोडावेळ झाल्यावर याबाबत प्रकरण काय आहे ते समजले. मात्र, तोपर्यंत अनेकांनी आपले नेटवर्क चेक केले. अनेकांनी मोबाईल ऑन-ऑफ करून पाहिले. लाखो लोक यामुळे वैतागले आहेत. यावरून अनेकांनी ग्रहण लागल्याचे मीम शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
- Whatsapp Server Down झाल्याने वैतागले युजर; म्हणाले ‘लागले ग्रहण’..!
- Whatsapp Down झाल्यामुळे वैतागले युजर; पहा नेमके काय झालेय यामागे कारण
- WhatsApp Tips: उत्तम गुणवत्तेचे फोटोज शेअर करायचे असतील, तर वापरा ही ट्रिक…
- WhatsApp वर सरकार करत आहे तुमची हेरगिरी ?; समजून घ्या संपूर्ण खेळ
दुपारी 12.45 वाजल्यापासून व्हॉट्सअॅप सर्व्हर डाउन आहे. मात्र, याबाबत व्हॉट्सअॅपकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. लाखो लोकांनी आपल्या समस्या ट्विटरवर शेअर केल्या आहेत. परिणामी #whatsappdown ट्रेंडिंग आहे. ट्विटरवर मीम्सचा महापूर आला होता. एकीकडे लोक समस्या शेअर करत होते आणि मजा करणारेही आले आहेत. देशभरातील लाखो लोक या प्लॅटफॉर्मचा वापर संदेश, फोटो आणि व्हिडिओ (platform to send messages, photos and videos) पाठवण्यासाठी करतात. व्हॉट्सअॅप आयफोन, अँड्रॉइड फोन ते लॅपटॉपवरही (WhatsApp runs on iPhones, Android phones to laptop) चालते. Downdetector या तांत्रिक समस्यांशी संबंधित समस्यांवर नजर ठेवणाऱ्या एजन्सीने सांगितले आहे की लोक संदेश पाठवू शकत नाहीत, त्याच्या अॅप आणि वेबसाइटशी संबंधित समस्या देखील आहेत. मेसेज पाठवण्यात अडचणी येत असल्याबद्दल बहुतेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत.