मुंबई – वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Westindies) आगामी T20 मालिकेसाठी युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोईची (Ravi Bishnoi) भारतीय संघात (Indian cricket team) निवड करण्यात येणार आहे तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर एकदिवसीय संघात कमबॅक करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी स्पष्ट केले आहे की कुलदीप यादव पुनरागमन करत असून रवी बिश्नोईची वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवड करण्यात येणार आहे तर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करणार आहे.(West Indies’ difficulty will increase, India’s’ this ‘spinner will make a comeback in the team)
भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात येणार आहे. तरी टी-२० संघात त्याची निवड करण्यात येणार नसल्याचीही माहिती समोर आली आहे . माजी कर्णधार विराट कोहलीला दोन्ही संघात स्थान देण्यात येणार आहे. कोहली आणि रवी शास्त्री यांच्या काळात कुलदीपला संघात विशेष प्राधान्य दिले जात नव्हते मात्र आता तो संघातील ट्रम्प कार्ड बनू शकतो. कुलदीपचे गेल्या वर्षी गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते.
कुलचाच्या नावावर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) जोडी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. कुलदीप यादवने एनसीएमध्ये गुडघ्याच्या ऑपरेशननंतर खूप मेहनत घेतली आणि आता तो खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी रणजी ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) संघाचा कर्णधार म्हणूनही त्याची निवड झाली होती.(West Indies’ difficulty will increase, India’s’ this ‘spinner will make a comeback in the team)