Weight Loss । अनेकांचे अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही आता वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात या हाय प्रोटीन पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला काही दिवसात परिणाम पाहायला मिळेल.
उच्च प्रथिने रात्रीचे जेवण तुम्हाला पोटभर ठेवत असल्याने भूक कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते. अशा प्रकारचे रात्रीचे जेवण रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी आणि स्नायूंना दुरुस्त करण्यास खूप मदत करते.अशाच काही हाय प्रोटीन रिच डिनरच्या कल्पनांबद्दल जाणून घेऊ.
पनीर भुर्जी
आता तुम्ही बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले, लसूण आणि मसाले घालून तयार केलेली पनीर भुर्जी गव्हाच्या रोटीसोबत तुमच्या डिनरमध्ये समाविष्ट करू शकता. प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध, पनीर भुर्जी वजन कमी करण्यासाठी एक निरोगी आणि चवदार डिनर पर्याय असेल.
ओट्स चिला
उच्च प्रथिने आणि फायबरने भरलेले ओट्सचे सेवन केले तर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. हे तुम्ही रात्रीच्या जेवणात सांबार किंवा चटणीसोबत खाऊ शकता.
अंडी
तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणात उच्च प्रथिने, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीने भरलेली अंडी खाऊ शकता. हे उकडलेले किंवा अंडी करी आणि भाताबरोबर खाऊ शकता.
ग्रील्ड चिकन ब्रेस्ट
विविध मसाल्यांनी तयार करण्यात आलेले ग्रील्ड चिकन ब्रेस्ट बेल मिरची, झुचीनी आणि ब्रोकोली यांसारख्या वाफवलेल्या भाज्यांसोबत खाऊ शकता. तुमच्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय असेल.
टोफू आणि तांदूळ
हे लक्षात घ्या की शाकाहारींसाठी टोफू हा उच्च प्रथिनांचा उत्तम पर्याय आहे. यात प्रथिनांसह लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने ऑलिव्ह ऑईल, कांदा, आले, लसूण आणि मध यापासून बनवलेल्या चविष्ट टोफूसह भाताचा आनंद तुम्ही घेऊ शकता. हे निरोगी आणि चवदार डिनर पर्याय आहेत, जे वजन कमी करण्यास खूप मदत करेल.