Weight loss : अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. वजन वाढले तर अनेक आजारांना आपण आमंत्रित करतो. पण तुम्ही आहारात कच्च्या केळीचा समावेश केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. कसे ते जाणून घ्या.
जाणून घ्या कच्ची केळी खाण्याचे फायदे
लठ्ठपणा
लठ्ठपणापासून कायमची सुटका मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या केळीचा समावेश करू शकता. कच्च्या केळ्यामध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर शरीरात पोहोचल्यानंतर ते लवकर पचत नाही, त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहून व्यक्ती जास्त खाणे टाळते. त्यामुळे त्याचे वजन नियंत्रणात राहते.
मधुमेह
कच्च्या केळीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असून कच्च्या केळ्यामध्ये आढळणारे अँटी-डायबेटिक गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. याशिवाय कच्च्या केळ्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने ते खाल्ल्यानंतर इन्सुलिन हार्मोन हळूहळू बाहेर पडतो. कच्च्या केळ्याचा आहारात समावेश करून रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित केली जाते.
बीपी समस्या
कच्च्या केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करत असून कच्च्या केळ्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळते, जे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवते. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. कच्च्या केळ्याचे सेवन केले तर हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.
त्वचा
कच्च्या केळ्याचे सेवन त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जात असून कच्च्या केळ्यामध्ये अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
पचन समस्या
कच्च्या केळ्यामध्ये असणारे फायबर आणि प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण चांगले पचनसंस्था राखण्यास मदत करत असल्याने अन्न लवकर पचतेच पण पचनाच्या समस्या देखील दूर होतात.