Weather Update Today: मार्च महिन्यात देशातील काही राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.
IMD नुसार मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
IMD नुसार पूर्व मध्य प्रदेशात 5 आणि 6 मार्च आणि विदर्भात 5 ते 7 मार्च दरम्यान पाऊस आणि वादळाचा उद्रेक दिसून येईल. तर, वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 3 दिवसांत जोरदार वारे (20-30 किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये शनिवार ते पुढील मंगळवार म्हणजेच 4 ते 7 मार्चपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 ते 6 मार्च दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या गडगडाटी वादळांची शक्यता लक्षात घेता IMD ने शनिवारी पश्चिम मध्य प्रदेश, रविवारी संपूर्ण मध्य प्रदेश आणि सोमवार आणि मंगळवारी पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भावर येलॉ अलर्ट जारी केले आहे.
पुढील 2 दिवसांत कर्नाटक किनारपट्टीच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील 2 दिवसांत उत्तर केरळ, दक्षिण कोकण आणि गोव्यात कमाल तापमान 36-38°C (सामान्यपेक्षा 3-5°C) दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 5 मार्चपासून या भागात कमाल तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
तथापि, पुढील दोन दिवसांत मध्य भारतातील दिवसाच्या तापमानात लक्षणीय बदल होणार नाही, अशी IMD ची अपेक्षा आहे. मात्र त्यानंतर तापमान 2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. तर पश्चिम भारतात पुढील दोन दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.