Rain Alert : देशाच्या बहुतांश भागात मान्सून (Monsoon) अॅक्टिव्ह आहे. आजही हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह बहुतांश राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज जारी केला आहे. आज उत्तरेकडून दक्षिणेकडे राज्यांमध्ये पावसाची (Rain) शक्यता आहे. उत्तराखंडबद्दल (Uttarakhand) सांगितले तर येथे हलका पाऊस पडेल, तर आकाश ढगाळ राहील.
गुजरात, दक्षिण राजस्थान, अंदमान आणि निकोबारमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशाच्या उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कर्नाटक, झारखंडमध्येही पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली-एनसीआरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता नाही, पण उकाड्यापासून दिलासा मिळेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
स्कायमेट हवामानानुसार (Skymate Weather), आज दक्षिण राजस्थान, गुजरात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) एक किंवा दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, विदर्भ, छत्तीसगडचा काही भाग, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय, ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीमचा उर्वरित भाग, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, किनारी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील सात दिवस पंजाबच्या (Punjab) बहुतांश भागात हलके ते ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊसही पडू शकतो. काही ठिकाणी सूर्यप्रकाश आल्यावर आर्द्रता वाढेल. हिमाचल प्रदेशात बुधवारी बहुतांश जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. किन्नौर, बिलासपूर आणि उना जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. सहा जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. सोलन आणि सिरमौर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. बुधवारीही जम्मू-काश्मीरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. या वर्षी जुलैमध्ये 150 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर ऑगस्टमध्येही आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.