Weather Update: सध्या देशातील बहुतांश भागात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तर दुसरीकडे पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्यानुसार उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये 16 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरिद्वार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीसाठी ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट केले की, “उत्तराखंडसाठी तात्काळ रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. डेहराडून, टिहरी, पौडी, चंपावत, नैनिताल आणि उधम सिंह नगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD नुसार, 14 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD नुसार, देशाची राजधानी दिल्ली, आसाम, मेघालय, नागालँड मणिपूर, मिझोरममध्ये पाऊस पडू शकतो.