Weather Update : ‘या’ भागात पावसाचा इशारा, होणार हिमवृष्टी; जाणून घ्या IMD अलर्ट

Weather Update : देशातील तब्बल 14 राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. देशात ही स्थिती 26 मार्चपर्यंत कायम राहणार असून यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

IMD ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, 22-26 मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याच बरोबर तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल तसेच केरळमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही आयएमडीने म्हटले आहे.

आयएमडीने असेही म्हटले आहे की एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हिमालयीन प्रदेशावर परिणाम होणार आहे. यामुळे 22 ते 24 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. या काळात उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्येही हलका पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेशात 22 मार्चलाही गारपीट होण्याची शक्यता आहे.

Facebook-Instagram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे, मेटाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुढील 5 दिवस हवामानाचा अंदाज

IMD ने सांगितले की, गुरुवारी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तसेच बिहारच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 9-12 अंश सेल्सिअस कमी होते. तर झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम आसाममध्ये ते 7-9° सेल्सिअसच्या खाली राहिले.

IMD च्या अहवालानुसार, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व विदर्भ, तेलंगणा, उत्तर तटीय आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये ते 2-4 अंश सेल्सिअस खाली राहिले. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 6-8 अंश सेल्सिअस जास्त होते. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर हरियाणा, गुजरातमध्ये ते 2-4 अंश सेल्सिअस जास्त होते. उर्वरित देश सामान्य स्थितीच्या जवळ राहिला.

Nokia 3210 भारतात करणार पुन्हा एंट्री, मिळणार जबरदस्त फीचर्स; ‘या’ दिवशी होणार लाँच

आयएमडीने म्हटले आहे की पुढील 5 दिवसात रायलसीमा, केरळ, माहे, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये आणि पुढील 2 दिवसात तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment