Weather Update : सावध राहा, पुढील 4 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस ; जाणून घ्या IMD अलर्ट

Weather Update : पुन्हा एकदा देशातील बहुतेक भागात अवकाळी पावसाची सुरुवात झाली आहे. यामुळे देशातील विविध भागात शेतकऱ्यांचे दररोज मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातच आता पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्चपर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यानंतर हवामान बदलेल.

गुगलने केली चक्क 1.2 कोटी अकॉऊंट डिलिट, तुम्ही करत नाहीना ‘ही’ चूक ?

IMD नुसार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 30 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. तसेच अरुणाचल प्रदेश. आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 31 मार्चपर्यंत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

IMD ने म्हटले आहे की बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 30 आणि 31 मार्च रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. चक्रीवादळ अभिसरण असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा राजस्थानवरील हवामानावर परिणाम होणार आहे.

आणखी एका ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम येत्या काही दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेशातील हवामानावर होईल. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; ‘हे’ आहे कारण

मार्चच्या उत्तरार्धात पर्वतांमध्ये बर्फवृष्टी

मार्च महिन्यातही सीमेवर बर्फवृष्टी सुरूच आहे. धारचुला आणि मुन्सियारी या उच्च हिमालयीन भागात बुधवारी ताजी बर्फवृष्टी झाली. अनेक ठिकाणी दोन फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. येथेही सखल भागात हलक्या रिमझिम पाऊस झाला. मात्र, त्यामुळे तापमानात फारसा फरक पडलेला नाही.

Leave a Comment