सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ०५, ०६, ०७ एप्रिल २०२२ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दिनांक ०८ ते १० एप्रिल दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस ते ४२ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस ते २९ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ४२ ते ५० % तर दुपारची सापेक्ष आद्रता २८ ते ३० % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी १२.३ किमी ते १७.५ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे, असे मोहोळ येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा (जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ , जि. सोलापूर) यांनी हवामान आधारित कृषि सल्ला यामध्ये म्हटले आहे.
- Goat Farming Info: शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनाचे ‘हे’ मुद्दे वाचा; अशी काळजी घ्या त्यांची
- Poultry Farming Info: अशी तयार करा कोंबड्यांना तुसाची गादी; वाचा काय आहे याचे नामके शास्त्र
- Subsidy scheme: ड्रोनच्या खरेदीसह ‘त्यासाठी’ही मिळते अनुदान; पहा कसे आहे तंत्रज्ञान आणि योजना
सोलापूर जिल्ह्यात दिनांक ०५,०६ एप्रिल २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासह (वार्याचा वेग ताशी ३०-४०कि.मी.) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असा इशाराही यामध्ये देण्यात आलेला आहे. विस्तारीत अंदाजानुसार ईआरएफएस मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ) दिनांक १० एप्रिल ते १६ एप्रिल २०२२ दरम्यान कमाल तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने उशिरा लागवड केलेल्या रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व इतर रब्बी पिकांची काढणी व मळणी करून घ्यावी व तयार शेती माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तसेच पुढील काळजी घ्यावी.
- तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याने उशिरा लागवड झालेल्या रब्बी पिकांची – ज्वारी, गहू , हरभरा, करडई इत्यादींची काढणी करुन घ्यावी.
- मळणी करणे शक्य नसल्यास, काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने योग्यरीत्या झाकून ठेवावीत.
- अवेळी पाऊसापासून बचावासाठी उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवावे.
- जनावरे सुरक्षीत ठिकाणी बांधावीत.
- मातीतील ओलावा टिकविण्यासाठी व बाष्पीभवन रोकण्यासाठी अच्छादनाचा वापर करावा.
- शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- पिकावर कीटकनाशकाची, बुरशिनाशकाची फवारणी करतांना योग्यती खबरदारी व काळजी घ्यावी.
- हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा.