Weather Update : उन्हाळ्यात पावसाळ्याचा फील! ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : देशात सध्या कडक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. मार्च महिन्यातील (Weather Update) कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळा आणखी अडीच महिने राहणार आहे. उन्हाळ्यात शक्यतो पाऊस होत नाही. परंतु सध्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. कडाक्याच्या उन्हात अनेक ठिकाणी जोरदार पाऊसही पडला आहे. आताही हवामान विभागाने देशातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा दिला आहे.

गंगा नदीच्या किनारी असलेल्या मैदानी भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडलेला (Heavy Rain) आहे. आता भारतीय हवामान खात्याने (IMD) ताजा अंदाज जाहीर केला (IMD Rain Alert) आहे. हवामान खात्याच्या मते आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशातील हंगामी हालचालींचा प्रभाव देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात दिसून येऊ शकतो.

Maharashtra Weather: सावधान, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, विदर्भात गारपीटीची शक्यता; जाणून घ्या ताजे अपडेट

Weather Update

हवामान विभागाने ईशान्य भारतात मुसळधार पावसाबाबत अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडला आहे. पूर्व गारो हिल्स जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी पाऊस झाला. याशिवाय पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील चेरापुंजीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडला. याशिवाय अनेक जिल्ह्यांत पावसाची नोंद घेण्यात आली. हवामानातील बदलामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी संततधार पावसामुळे उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव लोकांनी घेतला.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार हिमालयीन भागात हवामान पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे. हंगामी बदलांमुळे देशाच्या या भागामध्ये पाऊस आणि जोरदार वारे अपेक्षित आहेत. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजात म्हटले आहे, की पश्चिम हिमालयीन प्रदेशांना लागून असलेल्या उत्तर पश्चिम भारतातील हवामान 31 मार्चपर्यंत साधारण राहू शकते. 29 ते 30 मार्चपर्यंत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Weather Forecast : ‘या’ भागात ढगांचा गडगडाट अन् मुसळधार पाऊस, IMD ने जारी केला अलर्ट

देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात हवामान जवळपास साधारण राहील. थंडीचा प्रभाव संपल्याने दिल्ली एनसीआरच्या भागात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी 27 मार्च रोजी दिल्लीच्या हवामानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हवामान बदलाची शक्यता आहे. बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, मात्र पाऊस पडणार नाही.

Leave a Comment