Weather Update: देशातील काही राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे तापमानात देखील लक्षणीय घट होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे हवामान विभागाने देशाची राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार सारख्या राज्यांना पुन्हा एकदा पावसाच्या अलर्ट जारी केला आहे.
4 मे पर्यंत पाऊस पडेल
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार 8 मे पासून हवामान स्वच्छ होण्यास सुरुवात होईल. केवळ दिल्लीतच नाही तर जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि उत्तराखंडमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. पुढील चार दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या अवकाळी पावसाचे मुख्य कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढेल.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाचा जोर कायम आहे
5 मे पर्यंत पश्चिम हिमालयीन राज्यांतील हवामान असेच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये 4 एप्रिलपर्यंत हवामान आल्हाददायक राहील.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय, आयएमडीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्य भारतीय राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यातील काही भागांचा समावेश आहे.
या राज्यांमध्ये आज पाऊस पडू शकतो
दुसरीकडे, आजच्या हवामानाबद्दल सांगायचे तर, हलक्या ते मध्यम पावसासह, पश्चिम हिमालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय पश्चिम हिमालयाच्या वरच्या भागात आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या भागात हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये एक किंवा दोन जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा धोका
याशिवाय चक्रीवादळ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे विभागाकडून पुढील 5 दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. IMD नुसार, पुढील 2 दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. IMD ने 6 मे रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रसह अनेक राज्यात पावसाची शक्यता
ईशान्य भारत, दक्षिण ओडिशा, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.