Weather Update : देशातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या भागांमध्ये हवामान कसे असेल?
हवामान खात्यानुसार, पश्चिम उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात 25 ते 35 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
राजस्थानच्या अनेक भागात 45 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाईल. जैसलमेरमध्ये 47.5 अंश, जोधपूरमध्ये 47.4 अंश आणि जालोरमध्ये 47.3 अंश तापमानाची नोंद होऊ शकते. त्यामुळे येथे कडक ऊन कायम राहण्याची शक्यता आहे.
या भागात मुसळधार पाऊस पडेल
IMD नुसार केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर शुक्रवारी राज्यात दोन ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडीने एर्नाकुलम आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठीही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.