Weather Update: देशात येत्या काही दिवसात मान्सून दाखल होणार आहे मात्र त्यापूर्वी देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.
या अवकाळी पावसामुळे हवामान खात्याने उत्तराखंडसह इतर राज्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वायव्य भारतात 1 जूनपर्यंत पावसाळा सुरू राहील. काही ठिकाणी वादळी वारे तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत राहतील.
हिमाचल प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. अशीच स्थिती पुढील दोन दिवस उत्तराखंडमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागात ताशी 70 किलोमीटर वेगाने वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो, असे सांगण्यात आले.
केवळ उत्तर भारतातच नाही तर दक्षिण भारतातही पावसाने जोर धरला आहे. तमिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे 31 मे आणि 1 जून रोजी कर्नाटकातील काही अंतर्गत जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. केरळबद्दल सांगण्यात येत आहे की 1 ते 5 जून दरम्यान पावसाळा असेल.
उत्तर-पश्चिम भारतात पुढील दोन दिवस हवामान आल्हाददायक राहील. येथे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, बिहार आणि पश्चिम बंगालबाबत हवामान खात्याचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत या राज्यांतील तापमानात दोन अंशांनी वाढ होऊ शकते. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, “बिहारमध्ये 31 मेपर्यंत आणि पश्चिम बंगालमध्ये 2 जूनपर्यंत असेच उष्ण हवामान राहील.”