Weather Update: पुन्हा एकदा देशातील काही राज्यात धो धो पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशाची राजधानी दिल्लीत पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD ने 23 मे रोजी आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
IMD नुसार, आज उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, झारखंड आणि ओडिशामध्ये अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे (30-40 किमी प्रतितास वेगाने) आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि यानाम, तेलंगणा, रायलसीमा, कर्नाटक, केरळ , तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD ने बंगाल, हिमाचल प्रदेश, बिहार आणि सिक्कीममध्ये अनेक ठिकाणी वीज आणि वादळ (वाऱ्याचा वेग 50-60 किमी प्रतितास) गारांचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा (तास 40-50 किमी वेगाने) गडगडाट किंवा धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. झारखंडच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.