Weather Update : राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर अनेक भागात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. पुढील तीन दिवस (24, 25, 26 सप्टेंबर) दिल्लीसह अनेक भागांत पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळीही दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडत आहे. रविवारी आणि सोमवारीही हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा आणि गाझियाबादसह अनेक जिल्ह्यांतील शाळा पावसामुळे बंद करण्यात आल्या आहेत. या शाळा 26 सप्टेंबरला सुरू होतील. गुडगावमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रशासनाने घरून काम करण्याची (Work From Home) घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशातील संततधार पावसानेही लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पावसामुळे प्रशासनाने उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 11 जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तराखंडच्या अनेक भागात पाऊस (Rain In Uttarakhand) पडत आहे. पुढील तीन दिवसांत उत्तरकाशी, हरिद्वार, चमोली, बागेश्वर, पिथौरागढ, उधम सिंह नगर येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. सतर्कता म्हणून चमोलीच्या शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळ आणि ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, 24-25 सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. 24 सप्टेंबर रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 25 सप्टेंबर रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल (Rain Alert In West Bengal) आणि सिक्कीममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 ते 25 सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 सप्टेंबर रोजी आसाम आणि मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस सुरू राहील.