Weather Update: भारतीय हवामान विभागाने देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात पुढील काही दिवस
उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 20 मे रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD ने दक्षिण उत्तर प्रदेश तसेच पश्चिम राजस्थान, पूर्व झारखंड आणि उत्तर मध्य प्रदेशातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज, छत्तीसगडच्या वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे (तास 40-50 किमी वेगाने) आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ओडिशा, झारखंड, तेलंगणा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास वेगाने) पाऊस पडू शकतो.
तर त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल, केरळ , दक्षिण कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि यानाम आणि रायलसीमा येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा आणि गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान 40-42 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यच्या जवळपास आहे. येत्या काही दिवसांत वायव्य भारतात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. 20 ते 22 मे दरम्यान दक्षिण उत्तर प्रदेशातील विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये 21 ते 23 मे दरम्यान उष्णतेची लाट येऊ शकते. तर, आर्द्र हवा आणि उच्च तापमानामुळे, पुढील काही दिवसांत कोकण प्रदेशात आणि 20 मे रोजी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये उष्ण आणि अस्वस्थ हवामानाची शक्यता आहे.