दिल्ली : भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी सांगितले की दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, जे 6 मे च्या सुमारास चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या असह्य उकाड्यापासून लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अंदमानमधील परिस्थितीबद्दल माहिती देताना आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के. जेनामानी यांनी सोमवारी सांगितले की, ‘4 मे रोजी अंदमानमध्ये यंत्रणा तयार होत आहे. ६ मे रोजी कमी दाबाची निर्मिती होईल आणि त्यानंतर ते आणखी तीव्र होईल. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात राहणाऱ्यांसाठी इशारा देण्यात येत आहे. यंत्रणा अधिक तीव्र होण्याची चिन्हे असल्याने आम्ही लोकांना तेथे न जाण्यास सांगितले आहे.

हवामान संस्थेने हे देखील म्हटले आहे, की पुढील 4-5 दिवसांमध्ये वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट अपेक्षित नाही. चक्रीवादळाच्या प्रभावाखाली, 4 आणि 5 मे रोजी निकोबार बेटांवर आणि 6 आणि 7 मे रोजी अंदमान बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे पुढील 5 दिवसांत तुरळक ठिकाणी गडगडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ-महाराष्ट्रात 3 आणि 4 मे रोजी आणि तामिळनाडू-पाँडेचेरी-कराईकलमध्ये 5 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावाखाली पुढील 5 दिवसांत ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल-सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update : देशातील ‘या’ राज्यात पडणार भीषण उन्हाळा.. पहा, काय आहे हवामानाचा अंदाज..

Share.

Leave A Reply

Exit mobile version