Rain : सध्या देशात मान्सून (Monsoon) जोरात सुरू आहे. हवामान खात्यानुसार, पुढील 24 तासांत मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि पूर्व राजस्थानच्या (Rajasthan) पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचवेळी हवामान खात्याने दिल्लीच्या हवामानाबाबतही (Weather) माहिती दिली आहे. दुसरीकडे, किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोवा, महाराष्ट्र आणि हिमाचलमध्ये हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे.
खरं तर, भारतीय हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) हलक्या पावसासह ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्लीकरांना दमट हवामान जाणवेल. त्याच वेळी, दिल्लीतील प्रदूषणाची (Pollution) पातळी कमी ते मध्यम श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. सोमवारी दिल्लीत कमाल तापमान (Temperature) 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
तत्पूर्वी, रविवारी सरासरी कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे वर्षाच्या या वेळी सामान्य तापमानापेक्षा एक अंशाने जास्त होते. मंगळवारी किमान तापमान 26.6 अंश सेल्सिअस होते, जे या वर्षातील सामान्य तापमान आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि लगतच्या भागात पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर भोपाळ, उज्जैन, जबलपूर, रतलाम, नीमच आणि मंदसौरसह 39 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. इंदूर, ग्वाल्हेर, धार आणि खरगोनसह 12 जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय राजस्थान आणि झारखंडमध्येही (Jharkhand) मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच वेळी, वायव्य छत्तीसगड आणि लगतच्या ईशान्य मध्य प्रदेश आणि दक्षिण पूर्व उत्तर प्रदेशवर खोल दाबामुळे पाऊस तीव्र झाला आहे.
किनारी कर्नाटक, कोकण आणि गोवा, महाराष्ट्राचा (Maharashtra) काही भाग, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरातचा काही भाग, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगालच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंतर्गत कर्नाटक व्यतिरिक्त तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याआधी, रविवारच्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये 24 तास मुसळधार पावसाने (Heavy Rain) मोठा हाहाकार उडाला होता. हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि ढगफुटीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, उत्तराखंडमध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 13 जण बेपत्ता आहेत. झारखंडमध्ये पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर सात जण नद्यांच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. उत्तर प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला. ही संख्या जम्मू-काश्मीरमध्ये 2 आणि ओडिशात 6 आहे.