Weather Forecast : देशातील काही भागात मुसळधार तर काही भागात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने (IMD) 28 जुलैपर्यंत काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या काही भागात 25 आणि 27 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. यासोबतच ओडिशा, किनारी कर्नाटक, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारपट्टी आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे.
25 जुलै रोजी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल
हवामान खात्यानुसार हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दक्षिण हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थानच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 27 जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
26 जुलै रोजी जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, पंजाब, पश्चिम राजस्थान, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय येथे वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. 27 जुलै रोजी हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने 28 जुलैला अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे यासोबतच अलर्ट देखील जारी केला आहे.