Weather Alert: पुढील 3 दिवस सावध, महाराष्ट्रात धो धो पावसाचा इशारा, जाणून घ्या ताजे अपडेट्स

Weather Alert: जुन महिन्यात मान्सूनने देशातील बहुतेक भागात हजेरी लावल्याने अनेक भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. तर आता जुलै (July) महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात देखील अनेक राज्यांमध्ये धो धो पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

याच बरोबर पुढील 3 दिवसांसाठी भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रसह या भागात पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, गुजरात आणि हरियाणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशातही वादळासह मुसळधार पाऊस पडू शकतो.

पुढील चार-पाच दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात जुलैपर्यंत, उत्तराखंडमध्ये 4 जुलैपर्यंत, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 1 आणि 2 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सर्व भागात 3 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

येथेही मुसळधार पावसाचा इशारा

IMD नुसार, 3 जुलैपर्यंत देशातील सर्व भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सौराष्ट्र क्षेत्राला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे. सुरत, भुज, वापी, भरूच आणि अहमदाबाद शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.

Leave a Comment