Water politics Pune-Nagar: अहमदनगर (Ahmednagar news) : जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गेल्या तीन दशकांत पाण्यापासून वंचित ठेवण्याचा घाट पुणेकरानीं घातला आहे. आपल्या हक्काचे पाणी त्यांनी जाणीवपूर्वक अडवून ठेवले आहे. ते पाणी मिळविण्यासाठी बारामतीकरांशी संघर्ष करण्याची कसम घ्यावी लागेल असे अवाहन राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मा. केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेमधून स्थापन झालेल्या द भोर फाउंडेशन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बाळासाहेब गिरमकर, भाजपा शहराध्यक्ष मिलिंद भैय्या गंधे, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, अनिल ठवाळ, सुवेंद्र गांधी, पुरुषोत्तम लगड, संतोष लगड, अभिलाष घिगे, अँड. सुभाष भोर आदींसह दुष्काळी भागातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
ना. विखे म्हणाले की, मसाकळाई योजनेसाठी पाणी नाही असे लेखी पत्र देणारे पुण्यातील मंडळी या भागामध्ये जलसिंचनाची सुविधा आहे त्याच भागातील नदीवरील बंधार्यांना पुन्हा पाणी मंजूर करतात. पण ते आता आम्ही थांबवले आहे. एवढेच नाही तर आपल्या कुकडी कालव्याची पाणी वाहतूक क्षमता 40 टक्के कमी केली आहे. ती सुद्धा वाढवावी लागणार आहे. पुणेकरांनी स्वतःचे हित साधण्याच्या स्वार्थीपणा करुन दुष्काळी भागावर अन्याय केला आहे. पुढील काळात रखडलेले बोगद्याचे काम करावे लागणार आहे. स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सह्याद्री घाटमाथ्यावरून कोकणामध्ये समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्व भागात वळविण्याचे स्वप्न पाहिले होते ते साकार करण्यासाठी मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
द भोर फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि कसम चळवळीचे प्रणेते जगन्नाथ भोर यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी साकळाई, शहाजांपुर व कान्हूर पठार या उपसाजलसिंचन योजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी या भागात प्रबोधन चळवळ उभी करुन पाणी चळवळ यशस्वी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी कोकणात जाणारे 216 टीएमसी पाणी पूर्वेकडे वळवण्याची घोषणा केली आहे. सदर पाण्याचे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी भागास समन्यायी पद्धतीनेे वाटप करण्याबाबत द भोर फाऊंडेशन काम करणार असल्याचे श्री. भोर यांनी प्रास्ताविकात नमुद केले.
यावेळी सुरेश काटे, शरद कोठुळे, बाळासाहेब बागायतदार, संतोष चौधरी, भास्कर भोर, तुकाराम कातोरे, संतोष ढवळे, प्रकाश ठोकळ, मिटूशेठ कुलट, माऊली पठारे, काळे सर, पठारे सर, आबासाहेब सोनवणे, छबू कांडेकर, सुरेश रुपनर, संजय पाटील, सौ नाट, अँड. गेरंगे, शहाजी रणसिंग, बाळासाहेब शेळके, रमेश जाधव, सोन्याबापू जाधव, युवराज कारले, आबाजी मुठे, संदीप बोरकर, विविध गावचे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, सोसायटीचे चेअरमन व संचालक, महिला सरपंच, बचत गटाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भर पावसात पाण्यावर झडली चर्चा…
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला काहीसा उशीर झाला याचवेळी मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली. पडत्या पावसात ही सभा पार पडली. नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणार्या शेतकर्यांनी या पावसात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थिती दर्शवली.