Water Crisis in World : कर्नाटकातील बंगळुरू शहरात सध्या प्रचंड पाणीटंचाई निर्माण (Water Crisis in World) झाली आहे. लोकांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी या वर्षाच्या सुरुवातीला (Bengaluru Water Crisis) चिंता व्यक्त केली होती की भारतासह जगातील 240 कोटी लोकसंख्येला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. बंगळूरूमधील लोकांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बंगळुरू शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून पाणीटंचाई कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु यामुळे फारसा फरक पडताना दिसत नाही. लोकांना एका दिवसात आवश्यक तेवढेच पाणी सुद्धा मिळू शकत नाही अशी येथील परिस्थिती आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) म्हणाले की शहराला दररोज 2600 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे परंतु सध्या शहराला केवळ 500 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. भारतासह 25 देशांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राने (United Nations) या वर्षाच्या सुरुवातीला दिली होती जागतिक बँक (World Bank) आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा विविध (World Health Organisation) शहरांमध्ये पाणीटंचाईचा अंदाज व्यक्त केला होता. बंगळुरूनंतर जगभरात कोणती शहरे पाण्याच्या संकटाचा सामना करत आहेत याची माहिती घेऊ या..
India Maldives Row : मालदीवला भारतीयांचा झटका, ‘लक्षद्वीप’कडे मोर्चा; मालदीवचे ‘इतके’ नुकसान
Water Crisis in World
केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाउन मध्ये सध्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. सन 2017 आणि 2018 मध्ये धोकादायक जलसंकटाची परिस्थिती या शहरात निर्माण झाली होती. त्यावेळी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. पाण्याची पातळी आता 50% असली तरी शहरासाठी विशेषतः उन्हाळ्यात हे पाणी पुरेसे नाही.
कैरो
इजिप्तच्या 97% पाण्याचा स्रोत असूनही देशाची राजधानी कैरो शहराला पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जल प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येच्या बाबतीत इजिप्त हा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 2025 पर्यंत देशात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.
Water Crisis in World
जकार्ता
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहराला समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील एक कोटी लोकसंख्येपैकी निम्मी जनतेल पाइपलाइन द्वारे पाणीपुरवठा केला जातो. देशात अनधिकृत विहिरी खोदण्याचे काम जोरात सुरू आहे यामुळे भुगर्भातील पाण्याचा ऱ्हास होऊ शकतो आणि जकार्ताच्या 40% भाग समुद्रसपाटीपासून खाली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
मेलबर्न
दशकभराच्या पाण्याच्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराला आता जंगलतोड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलतोडीमुळे शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकूणच ऑस्ट्रेलियातील हे मोठे शहर आहे. या शहरात लोकसंख्या सुद्धा जास्त आहे. अशा परिस्थितीत जर येथे पाणीटंचाई निर्माण झाली तर लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Water Crisis in World
मेक्सिको
मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीच्या लोकसंख्येपैकी फक्त 30 टक्के लोकांना आठवड्यातून काही तास पाणीपुरवठा होतो तर 30 टक्के लोकांना दिवसातून एकदाच पाणी मिळते. शहरातील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दूरवरच्या स्त्रोतांतून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो आणि पाण्याचा पुनर्वापर करून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करता येऊ शकतो. याशिवाय पाईपलाईनमध्ये अडचणींमुळे मेक्सिको सिटीतील ४० टक्के लोकांना पाणी मिळत नाही. या परिस्थितीमुळे नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु यामुळे फारसा फरक पडलेला नाही.
19 ऑगस्ट 2023 रोजी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या एक्वाडक्ट वॉटर रिस्क ॲटलस रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की जगातील 25 देशातील 400 कोटी लोकसंख्येला वर्षातील एक महिना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. जे जगातील लोकसंख्येच्या जवळपास निम्मे आहे. 2050 पर्यंत हा आकडा 60% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असे या अहवालात म्हटले आहे. बहारीन, सायप्रस, कुवैत, लेबनॉन आणि ओमान या देशांना दरवर्षी पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यांना दुष्काळाचाही सामना करावा लागू शकतो असे या अहवालात म्हटले आहे.