Washington Sundar : भारताने काल आपल्या ICC विश्वचषक 2023 संघात शेवटच्या क्षणी बदल केला आहे. अक्षर पटेलच्या जागी अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विनचा (R. Ashwin) संघात समावेश करण्यात आला आहे. अश्विन हा माजी आयसीसी विश्वचषक विजेत्या संघात होता. त्याच्याकडे खूप अनुभव देखील आहे. तथापि, अनेक चाहत्यांना वाटले की वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) संधी मिळाली हवी होती.
अश्विन हा ऑफ स्पिनर आणि लोअर ऑर्डरचा फलंदाज आहे. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत एक अर्धशतक झळकावले आहे. सुंदरने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. आता आम्ही तुम्हाला अशी तीन कारणे सांगणार आहोत ज्यावरून तुमच्या सहज लक्षात येईल की अश्विनच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करणे योग्य राहिले असते.
सुंदर हा अश्विनपेक्षा चांगला फलंदाज
निवडकर्त्यांनी अक्षर पटेलची संघात निवड करण्याचे मुख्य कारण म्हणजे आठव्या क्रमांकावर फलंदाजी. पटेल फलंदाजीला सखोलता प्रदान करतो. रविचंद्रन अश्विन हा वॉशिंग्टनपेक्षा अधिक अनुभवी गोलंदाज असला तरी वॉशिंग्टन हा सर्वोत्तम फलंदाज आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. जेव्हा संघाला त्याची गरज असते तेव्हा सुंदर फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकतो.
सुंदरची फिल्डिंग चपळ
सुंदरला रविचंद्रन अश्विनपेक्षा संधी मिळण्याचे आणखी एक कारण म्हणजे तो अनुभवी ऑफस्पिनरपेक्षा चांगला क्षेत्ररक्षक आहे. गेल्या काही वर्षांत सुंदरने भारतीय संघासाठी काही अविश्वसनीय झेल घेतले आहेत. तो मैदानावर भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
सुंदरने 2023 मध्ये अश्विनपेक्षा जास्त सामने खेळले
वनडे फॉरमॅटला सरावाची गरज आहे. अश्विनने यावर्षी फक्त दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर सुंदरने देशांतर्गत द्विपक्षीय मालिका तसेच 2023 मध्ये आशिया कप फायनल खेळली आहे. कदाचित याच कारणामुळे सुंदरचा विश्वचषक संघात समावेश करण्याचा विचार झाला असावा.