मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. तरी देखील लोक दुचाकी खरेदी करत आहेत. मात्र, दुचाकीसाठी इंधनाचा खर्च वाढला आहे. कारण, पेट्रोलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. त्यात जर आपली मोटारसायकल सुस्थितीत नसेल तर इंधनावर होणारा खर्च आधिक वाढतो. कारण, दुचाकी व्यवस्थि नसेल तर मायलेज कमी होतो, त्यामुळे पेट्रोल नेहमीपेक्षा जास्त लागते, सध्याच्या महागाईच्या काळात वाहनधारकांना त्रासदायकच आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुचाकी वाहनाची योग्य काळजी कशी घ्यायची, याबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुमचे वाहन सुस्थितीत राहिल आणि इंधनावरील खर्चही कमी होईल.
टायर हा तुमची दुचाकी आणि रस्ता यांच्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. म्हणूनच वाहनांच्या टायरची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. टायरमध्ये हवेचा दाब योग्य ठेवा. तसेच टायर योग्य वेळी बदलणे महत्त्वाचे आहे.
दुचाकी वाहनाची योग्य देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा वाहनाचे इंजिन नीट काम करणार नाही. मोटारसायकलचा एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच, स्पार्क प्लगला आवश्यक विद्युत प्रवाह मिळतो आणि तो कार्बन मुक्त असल्याची खात्री करा.
तुमची दुचाकी नेहमी स्वच्छ ठेवा. दुचाकी स्वच्छ असल्यामुळे तिच्या वेगात कोणताही अडथळा येत नाही आणि अनावश्यक इंधन खर्चात बचत होते. जर तुम्ही मोटारसायकल चिखलात चालवली असेल तर लवकरात लवकर त्यातील चिखल काढा. तुम्ही चिखल कोरडा होऊ दिल्यास, तुमच्या दुचाकीला गंज येण्याचा धोका वाढतो.
दुचाकीमधील चेन, इंजिन आणि आवश्यक तेथे वेळोवेळी ऑइल करा. यामुळे वाहनाचे मायलेज सुधारते. जर दुचाकीला डिस्क ब्रेक असतील तर इंजिन ऑइल, कुल फ्लुइड आणि ब्रेक ऑइलची पातळी योग्य ठेवा.
जर तुम्ही मोटारायकलवर अतिरिक्त वजन टाकले तर ते नैसर्गिकरित्या इंजिनची कामात आणखी वाढ करेल. त्यामुळे वाहनाचा वेग वाढण्यासाठी इंधन सुद्धा जास्त लागेल. जर तुम्ही दुचाकीवर सतत अतिरिक्त वजन टाकले तर तर दुचाकीवरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे दुचाकीवर आवश्यकतेपेक्षा आणि आवश्यक नसेल तर अतिरिक्त वजन टाकू नये.