Voter ID : कामाची बातमी! मतदार ओळखपत्र नसतानाही करता येईल मतदान, कसे ते जाणून घ्या

Voter ID : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. जर तुम्हाला मतदान करायचे असेल तर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असावे लागते. जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार आहे.

समजा आता तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर अजिबात काळजी नका. कारण तुम्ही अशाही वेळी बूथवर जाऊन मतदान करू शकता. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना देशभरात मतदानाचा अधिकार असून मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करण्यासाठी सर्वात अगोदर आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही केले जाते.

ऑनलाइन मोड

तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट करायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या साइटवर जाऊन ‘फॉर्म 6’ भरावा लागणार आहे. नाव, जन्मतारीख आणि पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील द्यावे लागतील. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे.

ऑफलाइन मोड

ऑफलाइन मोडसाठी फॉर्म 6 निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी आणि बूथ स्तर अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असून व्यक्ती आपली आवश्यक कागदपत्रे अर्जाशी संबंधित अधिकारी किंवा सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्यासमोर सादर करू शकते. ते पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाऊ शकतात किंवा तुमच्या मतदान क्षेत्राच्या बूथ लेव्हल ऑफिसरला दिले जातील.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मतदार ओळखपत्र नसतानाही मतदान करू शकतो. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत असावे लागते. या यादीत नाव आल्यावर मतदार ओळखपत्र नसतानाही मतदान सहज करता येते.

Leave a Comment