मुंबई : व्होडाफोन आयडीया उत्तम प्लान ऑफर करत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये बाजारातील काही स्वस्त योजना देखील आहेत. Vodafone-Idea च्या अमर्यादित योजना सर्वोत्तम फायदे देतात. त्याच वेळी जर तुम्हाला अधिक डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन खूप कमी खर्चात हवे असेल तर डेटा अॅड-ऑन योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कंपनीच्या डेटा प्लानची सुरुवातीची किंमत 82 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला सोनी लिव आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.
व्होडाफोन आयडीयाचा 82 रुपयांचा प्लान खूप चांगला आहे. कंपनी या प्लानमध्ये इंटरनेट वापरासाठी एकूण 4GB डेटा देत आहे. प्लान 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. कंपनीच्या या प्लानची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी Sony Live Mobile चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
व्होडाफोनचा हा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 8 GB डेटा मिळेल. या प्लानची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कंपनी Disney + Hotstar चे 3 महिन्यांसाठी फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. डेटा पॅकमुळे तुम्हाला यामध्ये मोफत कॉल आणि एसएमएसचे फायदे मिळणार नाहीत. एअरटेल त्याच्या 181 रुपयांच्या ऑफरमध्ये डिस्ने+ हॉटस्टार 3 महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. प्लानची एकूण वैधता 30 दिवस आहे. इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला त्यात दररोज १ जीबी डेटा मिळेल. एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये इतर अनेक डेटा प्लान आहेत, परंतु ते Hotstar वर मोफत प्रवेश देत नाहीत.
- वाचा : जिओलाही टक्कर देणारा आहे की..! ‘हा’ प्लान देतोय जबरदस्त फायदे; रिचार्ज करण्याआधी चेक करा डिटेल..
- भारीच की.. एअरटेलने आणला ‘हा’ खास प्लान.. त्याच किंमतीत मिळतील ‘हे’ फायदे; चेक करा डिटेल