मुंबई – देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Vodafone Idea चे बहुतेक प्लान्स Airtel आणि Jio च्या प्लानबरोबर जुळतात. पण या कंपनीच्या काही अशा योजना आहेत ज्या इतर कोणतीही कंपनी देत नाही. आज आम्ही तुम्हाला Vodafone-idea चा असाच एक प्रीपेड प्लान (Prepaid Plan) सांगत आहोत, ज्यामध्ये दररोज 3.5 GB डेटा मिळेल. या प्लानबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या.
व्होडाफोन आयडियाचा असा एकच प्लान आहे. या प्लानची किंमत 409 रुपये आहे. यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3.5 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे एकूण डेटा 98 GB होतो. यासोबत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉल (Unlimited Voice Call) आणि दररोज 100 एसएमएस (SMS) दिले जातात. यामध्ये तुम्हाला इतर 4 सुविधाही दिल्या जातात. दुपारी 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटा (Unlimited Data) उपलब्ध आहे. वीकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत, आठवड्यातील उर्वरित डेटा आठवड्याच्या शेवटी वापरला जाऊ शकतो. याशिवाय, Vi Movies आणि TV VIP चे सबस्क्रिप्शन (Subscription) आणि डेटा डिलाइट (Data Delight) सुविधा उपलब्ध आहे.
जिओचा 419 रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओचा (Reliance Jio) या किमतीच्या रेंजमध्ये 419 रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3 GB डेटा दिला जातो, जो Vi प्लानपेक्षा थोडा कमी आहे. यामध्ये जिओ अॅप मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये डेटा कमी मिळत आहे. तसेच किंमत सुद्धा 10 रुपये जास्त आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला हा प्लान खर्चिक ठरू शकतो.
Jio Recharge Plan : जिओचा धमाका..! अगदी कमी किंमतीत आणलाय ‘हा’ खास प्लान; जाणून घ्या, डिटेल..