Vladimir Putin | पुतीन पुन्हा रशियाचे सत्ताधीश; शपथ समारंभावर ‘या’ देशांचा मात्र बहिष्कार

Vladimir Putin : रशियात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांनी (Vladimir Putin) विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुतीन यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी ही शपथ घेतली असली तरी रशिया युक्रेन युद्धाचे कारण (Ukraine Russia War) पुढे करत अनेक देशांनी या समारंभावर बहिष्कार टाकला होता. पाश्चिमात्य देश या युद्धासाठी रशियाला जबाबदार धरत आहेत. म्हणून अमेरिका, कॅनडासह युरोपातील ब्रिटेन आणि अन्य काही देशांनी या समरंभावर पूर्णपणे बहिष्कार टाकला होता.

व्लादिमीर पुतिन आता पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष (Russian President) बनले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी एका समारंभात नवीन सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. युक्रेनमधील रशियाच्या युद्धामुळे अमेरिका आणि इतर अनेक पाश्चात्य देशांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मॉस्को येथील ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये पुतिन यांनी शपथ घेतली. हे तेच ठिकाण आहे जिथे रशियाच्या झार घराण्यातील तीन राजे यांचा राज्याभिषेक झाला होता.

Ukraine Russia War : दोन वर्षांनंतरही युद्ध सुरूच; अखेर युक्रेनच्या सैन्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुतिन यांनी याआधी 2000 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ते 2004, 2012 आणि 2018 मध्येही राष्ट्रपती झाले आहेत. पुतीन 1999 पासून राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेत राहिले. युक्रेनमध्ये हजारो सैन्य पाठवल्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपला नवीन कार्यकाळ सुरू केला.

रशियात पुतिन यांना एक कठोर नेता म्हणून ओळखले जाते. देशात त्यांच्या लोकप्रियतेमागे हे एक मोठे कारण आहे. रशिया युक्रेन युद्धात त्यांच्यावर युद्ध गुन्ह्याचे आरोप लागले असताना रशियातील एक मोठा वर्ग आजही त्यांच्या पाठिशी उभा आहे. रशियन नागरिकांना असे वाटते की अमेरिका आणि युरोप सारख्या पश्चिमी देशांना फक्त व्लादिमीर पुतिन हेच जशास तसे उत्तर देऊ शकतात. फेब्रुवारी महिन्यात एक सर्वे करण्यात आला होता. या सर्वेत 75 टक्के लोकांना पुतिन यांनाच मतदान करणार असल्याचे म्हटले होते.

Russia President Election : रशियातही निवडणुकांची धामधूम; मतदान सुरू, कोण होणार राष्ट्राध्यक्ष?

Leave a Comment