Vivo Y36t : विवोने लॉन्च केला जबरदस्त फीचर्स असणारा स्वस्त फोन, जलद चार्जिंगसह किंमत असेल 8700 रुपये

Vivo Y36t : Vivo ने 6GB RAM सह स्वस्त फोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 8700 रुपये इतकी आहे. यात जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देखील आहे. हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असणार आहे.

Vivo Y36t चे फीचर्स

Vivo ने Y36t Space Black आणि Sapphire Green दोन रंग पर्यायांमध्ये लाँच केले आहे. यात 6.56 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असून जो वॉटरड्रॉप कटआउटसह येतो. डिस्प्ले 60 Hz रिफ्रेश रेट आणि 1612×720 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.

Vivo Y36t मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर असून ज्यात 2.0GHz वर क्लॉक केलेला ड्युअल-कोर सेटअप आणि 1.8GHz वर हेक्सा-कोर कॉन्फिगरेशन समावेश आहे. हे 6GB LPDDR4X रॅम आणि 128GB eMMC5.1 स्टोरेजसह येते. या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5000mAh बॅटरी आहे.

कंपनीचा आता हा बजेट स्मार्टफोन असल्याने यात बेसिक कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे जो 4x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात सुरक्षेसाठी चेहऱ्याची ओळख आणि फोन अनलॉक करण्यासाठी समर्थन समाविष्ट आहे.

Vivo Y36t च्या इतर विशेष फीचर्समध्ये 150% लाऊड ​​व्हॉल्यूम मोड, धूळ आणि पाणी प्रतिरोधकांसाठी IP54 रेटिंग समाविष्ट आहे. हा फोन Android 14 वर आधारित OriginOS 4 वर काम करेल.

जाणून घ्या किंमत

सध्या कंपनीने ते चीनमध्ये लॉन्च केले आहे. हे चीनच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Jingdong वर खरेदीसाठी उपलब्ध असून हा फोन 749 युआन (अंदाजे रु. 8,700) च्या सुरुवातीच्या सवलतीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. सवलत कालावधी संपल्यानंतर, त्याची किंमत 799 युआन (सुमारे 9,300 रुपये) असणार आहे.

Leave a Comment