मुंबई : सध्या देशात अनेक कंपन्या नवीन स्मार्टफोन आणत आहेत. आताही दिग्गज चायनीज स्मार्टफोन कंपनी Vivo ने आपला Vivo Y21G स्मार्टफोन देशातील बाजारात लाँच केला आहे. Y सीरीजच्या या नवीनतम स्मार्टफोनमध्ये MediaTek MT6769 प्रोसेसर, LCD डिस्प्ले आणि 13 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे.

Vivo Y21G मध्ये 6.51 इंच HD + LCD डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 720×1600 पिक्सेल रिजोल्यूशन मिळते. या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डने आणखी वाढ करता येऊ शकते. फोनची परिमाणे 164.26×76.08 मिमी, जाडी 8.00 मिमी आणि वजन 182 ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek MT6769 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे Android 11 वर आधारित कार्य करते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.0, GPS, GLONASS / Beidou, Galileo, USB Type-C आणि 3.5mm ऑडिओ जॅक दिले आहे.

Vivo Y21G स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे आहेत, 13MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. व्हिडिओ आणि सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y21G च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,990 रुपये आहे. हा फोन रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.

वाव.. 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन; पहा, काय आहेत दमदार फिचर..

Share.

Leave A Reply

Exit mobile version