Vivo X100 Pro 5G । 32MP कॅमेरा असणाऱ्या फोनवर मिळतेय 10 हजारांची सवलत, ‘या’ ठिकाणी मिळेल संधी

Vivo X100 Pro 5G । 32MP कॅमेरा असणाऱ्या 100W चार्जिंग सपोर्टसह Vivo च्या फोनवर तब्बल 10,000 रुपयांची थेट सूट मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील.

Vivo X100 Pro 5G

सवलतीचा विचार केला तर फ्लिपकार्ट आणि क्रोमा ऑनलाइन स्टोअरद्वारे Vivo च्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर सर्वात मोठी सूट दिली जात आहे. तसेच किमतीबद्दल बोलायचे झाले तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज सह या डिवाइसचे वेरिएंट Rs 89,999 मध्ये लिस्ट केले गेले आहे. Flipkart वर HDFC बँक कार्ड आणि Croma वर IDFC आणि Kotak बँक कार्डच्या मदतीने पेमेंट केले तर तुम्हाला 10,000 रुपयांची सवलत मिळेल.

जुना फोन एक्सचेंज करायचा असल्यास तुम्हाला Vivo स्मार्टफोनवर कमाल 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळते. पण या सवलतीचे मूल्य जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याची स्थिती यावर अवलंबून असते. तुम्हाला एकाच वेळी बँक आणि एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ घेता येत नाही. फोन Astroid Black, Startrail Blue आणि Sunset Orange कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Vivo X100 Pro 5G चे फीचर्स

या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 3000nits पीक ब्राइटनेससह 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले असून हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 9300 प्रोसेसर आणि Android 14 वर आधारित FunTouchOS 14 सह मजबूत कामगिरीसाठी येतो. इतकेच नाही तर Vivo X100 Pro 5G च्या मागील पॅनलवर 50MP मुख्य, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो आणि 50MP अल्ट्रावाइड सेन्सरसह Zeiss ऑप्टिक्ससह कॅमेरा सेटअप प्रदान केला आहे.

Vivo च्या या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची 5400mAh बॅटरी 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा पर्याय देतो.

Leave a Comment