Vivo X Fold 3 Pro : दमदार प्रोसेसर आणि 32MP सेल्फी कॅमेरा! लवकरच लाँच होणार विवोचा तगडा फोन

Vivo X Fold 3 Pro : भारतीय बाजारात विवो आपले शानदार फोन लाँच करत असते. कंपनीच्या सर्वच फोनला बाजारात चांगली मागणी देखील असते. अशातच आता कंपनी आपला Vivo X Fold 3 Pro हा फोन लाँच करणार आहे. यात 32MP सेल्फी कॅमेरा, 8.03 इंच डिस्प्ले आणि 100W चार्जिंग तसेच दमदार प्रोसेसर मिळेल.

नवीन फोनमध्ये मिळतील शानदार फीचर्स

लीकनुसार, Vivo च्या भारतीय प्रकारात फोनचा बाह्य डिस्प्ले 6.53 इंच असणार आहे आणि तो 2480×2200 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. या LTPO डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ब्राइटनेस 4500 nits असू शकतो. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी यामध्ये अल्ट्रा-सॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर देईल.

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा नवीन Vivo फोन 16 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 1 TB UFS 4.0 पर्यंत स्टोरेजसह येईल. त्याशिवाय प्रोसेसर म्हणून, तुम्हाला फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर पाहायला मिळेल. तसेच फोटोग्राफीसाठी तुम्हाला या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे पाहायला मिळतील. यात 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह आणि 3x ऑप्टिकल झूमसह 64-मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स असणार आहे.

तर सेल्फीसाठी, कंपनी फोनमध्ये V3 इमेजिंग चिपसह 32-मेगापिक्सेल कॅमेरा देईल. या फोनची बॅटरी 5700mAh असेल, जी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तुम्हाला फोनमध्ये 50 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल. इतकेच नाही तर पॉवरफुल साउंडसाठी कंपनी फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर देईल. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 7, ड्युअल 5G सिम आणि NFC सह सर्व मानक पर्याय उपलब्ध करून दिले जातील.

Leave a Comment