Vivo X Fold 3 Pro : Vivo ने भारतीय बाजारात आता सर्वात पातळ आणि हलका फोल्डेबल फोन आणला आहे. जो जबरदस्त बॅटरीसह आणि अप्रतिम कॅमेऱ्यासह खरेदी करता येईल. Vivo X Fold 3 Pro असे या फोनच्या मॉडेलचे नाव आहे.
जाणून घ्या Vivo X Fold 3 Pro ची किंमत
किमतीचा विचार केला तर कंपनीच्या या शानदार फोल्ड फोनची किंमत 1,59,999 रुपये ठेवली आहे. तुम्हाला हा Vivo फोन Flipkart, Amazon आणि Vivo च्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की कंपनीच्या या फोनची पहिली विक्री 13 जून रोजी होणार आहे.
Vivo X Fold 3 Pro
SBI आणि HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे Vivo X Fold 3 Pro खरेदी केला तर या फोनवर रु. 15,000 ची झटपट सूट दिली जात आहे. तर खरेदीदारांना दुसऱ्या फोनसाठी फोनची देवाणघेवाण करताना 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळू शकेल.
इतकेच नाही तर या स्मार्टफोनसोबत एकदा मोफत स्क्रीन बदलण्याची सुविधाही देण्यात येत आहे. त्याशिवाय 24 महिन्यांपर्यंतचा विना-किंमत EMI पर्याय आहे आणि EMI 6,666 रुपये प्रति महिना सुरू होतो. Vivo चा वायरलेस चार्जर 2.0 17 जूनपासून Vivo ई-स्टोअर आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे 5,999 रुपयांना खरेदी करता येईल.
जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम फोन आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.हे लक्षात घ्या की फोन नवीन फोल्डेबल 16GB रॅम, 50W वायरलेस फ्लॅश चार्ज आणि ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यांसह येतो. लाँच झाल्यांनतर हा Vivo फोन वनप्लस, सॅमसंग आणि टेक्नोशी स्पर्धा करेल.