Vivo X Fold 3 : लवकरच लाँच होणार Vivo चा जबरदस्त फोल्डेबल फोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Vivo X Fold 3 : भारतीय बाजारात आता लवकरच Vivo X Fold 3 हा फोन लाँच होणार आहे. विशेष म्हणजे कंपनीचा हा फोन फोल्डेबल फोन असून ज्यात अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

Vivo X Fold 3 मध्ये, तुम्हाला Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 5,500mAh बॅटरी मिळते. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 8.03-इंचाचा 2K प्राथमिक डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात येत आहे.

या दिवशी भारतात होणार लॉन्च

रिपोर्टनुसार, कंपनी आपला Vivo X Fold 3 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करेल. पण कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. हे मॉडेल उद्योगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन असल्याचे म्हटले जात आहे. दुमडलेले असूनही हा फोन फक्त 10.2 मिमी जाड आहे.

किती आहे Vivo X Fold 3 ची किंमत?

Vivo X Fold 3 तीन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. किमतीचा विचार केला तर त्याच्या 12GB + 256GB ची किंमत CNY 6,999 म्हणजेच अंदाजे 80,000 रुपये इतकी असणार आहे. 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच अंदाजे 87,800 रुपये असून त्याच्या टॉप व्हेरिएंट16GB + 512GB ची किंमत CNY 7,999 म्हणजेच अंदाजे 93,600 रुपये इतकी आहे. तसेच Vivo X Fold 3 हा फोन चीनमध्ये फेदर व्हाइट आणि थिन विंग ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे.

Vivo ची संभाव्य फीचर्स

हा फोन चीन मध्ये आधीच लॉन्च झाला असून भारतीय व्हर्जनचे फिचर्सही यासारखेच असतील अशी शक्यता आहे. कंपनी यात यात 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS4.0 इनबिल्ट स्टोरेजसह ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देऊ शकते.

या जबरदस्त फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट असून ज्यात 50MP VCS बायोनिक प्राथमिक सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 50MP पोर्ट्रेट शूटरचा समावेश आहे. या फोनच्या कव्हर आणि मुख्य डिस्प्ले दोन्हीमध्ये 32-मेगापिक्सेलचे दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. कंपनीच्या या फोनमध्ये 5,500mAh बॅटरी असून ती 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Leave a Comment