Vivo V40 SE । तुम्ही आता तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकता. फोनमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
Vivo V40 SE 4G चे फीचर्स
Vivo V40 SE 4G ची परिमाणे 163.17×75.81×7.79 मिमी आणि वजन 186 ग्रॅम असून व्हेगन लेदर बॅक असलेल्या फोनच्या पर्पल एडिशनची जाडी 7.99 मिमी आणि वजन 191 ग्रॅम इतकी आहे. फोनमध्ये पंच-होल कटआउटसह 6.67-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले मिळेल. तो फुल एचडी प्लस रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल तर अतिरिक्त सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
इतकेच नाही तर नवीन Vivo V40 SE 4G मध्ये स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर, 8GB LPDDR4x रॅम, 128GB/256GB UFS 2.2 स्टोरेज, 80W रॅपिड चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी, 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम आणि मायक्रोएसडी कार्ड दिले आहे. तसेच हा फोन Android 14 वर Funtouch OS 14 वर आधारित चालतो.
फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला असून या फोनच्या मागील बाजूस, यात 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सेलचा बोकेह कॅमेरा आणि फ्लिकर सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ड्युअल सिम, 4G VoLTE, 2.4GHz-5GHz Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखी शानदार फीचर्स दिली आहेत.
Vivo V40 SE 4G ची किंमत
Vivo V40 SE 4G चेक रिपब्लिकमध्ये 4,999 PLN (सुमारे 18,000 रुपये) मध्ये केला आहे. हे क्रिस्टल ब्लॅक आणि लेदर पर्पल सारख्या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.